Monday, May 27, 2024
Homeनगरदुचाकी अपघातात जवानासह सोनेवाडीतील तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात जवानासह सोनेवाडीतील तरुणाचा मृत्यू

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

शिर्डी नाशिक महामार्गावर (Shirdi Nashik Highway) 16 जुलै रोजी पाथरे शिवारात झालेल्या अपघातात (Accident) भारतीय सैन्य दलातील (Indian Army) धानोरे, ता.निफाड येथील सचिन राजाराम गुजर (वय 24) व अक्षय जावळे (वय 25) सोनेवाडी यांचा मृत्यू (Death) झाला असून अक्षय गायकवाड, खेडलेझुंगे हा तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे.

- Advertisement -

अक्षय जावळे व सचिन गुजर हे दोघे मावसभाऊ होते. त्यांच्या अपघाती (Accident) निधनाने सोनेवाडी व धानोरे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर अक्षय जावळे यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सोनेवाडी (Sonewadi) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शिर्डी (Shirdi) येथे उपचारादरम्यान काल सचिन गुजर यांचा मृत्यू (Death) झाला. त्यांचे पार्थिव शेवविच्छेदन करण्यासाठी नाशिक (Nashik) येथे हळविण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी ‘त्या’ मौलानाला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

सिन्नर (Sinner) येथून पल्सर मोटरसायकल (एमएच 15 एचए 9006) जावळे व गुजर सोनेवाडीला येत असताना अक्षय गायकवाड यांच्या प्लॅटिना मोटरसायकल (एमएच 15 डीबी 9670) यांची गाडी विरुद्ध बाजूला वळत असताना जोराची धडक (Hit) झाली. अपघाताचा आवाज ऐकून पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, मनोज गवळी यांनी मोबाईल व आधार कार्डचा संदर्भ घेत नातेवाईकांना या संदर्भात कल्पना दिली. अपघातात (Accident) जखमी झालेल्या या तिघांनाही तातडीने शिर्डी (Shirdi) येथे सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अक्षय जावळे यांचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू (Death) झाला असल्याचे डॉक्टरने सांगितले तर मेजर सचिन गुजर यांच्यावर उपचार चालू होता मात्र उपचाराला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचाही दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते.

निळवंडेत 2500 दलघफू पाणीजिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती बिकटअंकुश चत्तर हल्ला प्रकरण; नगरसेवक शिंदेसह पाच जण एलसीबीच्या ताब्यात

- Advertisment -

ताज्या बातम्या