Sunday, December 15, 2024
Homeनगरदुचाकीच्या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी

दुचाकीच्या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील गुहा येथील नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना काल पहाटेच्या सुमारास गुहा शिवारात घडली. अपघात

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी, श्रीरामपूरच्या दत्तनगर येथील केशव मारूती केदार व त्यांच्या पत्नी मिराबाई केशव केदार हे दाम्पत्य गुहा येथील आपल्या नातेवाईकाच्या घरी सोमवार दि. 6 मे रोजी रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रमाला आले होते. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांना श्रीरामपूर येथे कामावर जायचे असल्याने ते काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास आपल्या लुना या दुचाकीवर श्रीरामपूर येथे जाण्यास निघाले असता नगर-मनमाड महामार्गावर गुहा शिवारात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

या धडकेत केदार दाम्पत्य रस्त्याच्या बाजूला दूरवर उडून पडले. या धडकेच्या आवाजाने शेजारी असलेल्या हॉटेलचे मालक ऋषी कोळसे व शशि कोळसे, संजय पांढरे, राजू उर्‍हे,सतीश गायकवाड यांनी धावत येऊन बेशुध्द असलेल्या जखमींना रवी देवकर यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी राहुरी येथे नेले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु मिराबाई केशव केदार (वय 59) या उपचारापुर्वीच मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय आधिकार्‍यांनी घोषित केले. तसेच केशव केदार हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू असल्याचे समजते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या