Tuesday, May 5, 2026
HomeनगरAccident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgaon

श्रीरामपूर – पुणतांबा मार्गावर खैरी निमगाव येथील हॉटेल साई गितगंगा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यु झाल्याची घटना घडली. गुरुवारी 30 एप्रीलला रात्री 8 ते 9 च्या सुमारास श्रीरामपूर – पुणतांबा मार्गावरील खैरी निमगांव येथील हॉटेल साई गितगंगा समोर झालेल्या या अपघातात पुणतांबा येथील गौरव अशोक बनकर (वय 24) हा जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. गौरव अशोक बनकर हा त्याच्याजवळील दुचाकीवरून पुणतांब्याच्या दिशेने जात असताना रात्री 8 ते 9 च्या सुमारास भरधाव एका अज्ञात वाहनाने गौरव याच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

- Advertisement -

या अपघातात गौरव बनकर गाडीसह बर्‍याच अंतरावर रस्त्यावर फरफटत गेला. या घटनेत तो जागेवरच मयत झाला. घटनेनंतर खैरी निमगाव येथील गावकर्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्याला रुग्णवाहिकेतुन श्रीरामपूरच्या दिशेने पाठवून दिले. डॉक्टरांनी तपासून रात्री उशिरा गौरव बनकर यास मृत घोषीत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान मयत गौरव बनकर हा श्रीरामपूर शहरातील एका कापड दुकानात कामाला होता. रात्री कामावरून घरी येत असताना हीघटना घडली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...