Thursday, April 10, 2025
HomeनगरAccident News : अपघात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

Accident News : अपघात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

नागरिकांमध्ये संताप

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरातील मध्यवर्ती आणि वाहतूकगर्दीचा मुख्य केंद्र असलेल्या कोरडगाव चौकात गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी आणि भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात विकास परमेश्वर सोनवणे (वय 20, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) या युवकाचा जागीच मृत्यू (Youth Death) झाला. या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

विकास हा दुचाकीवरून कोरडगावच्या दिशेने जात असताना, त्याच दिशेने जाणार्‍या लाकडांनी भरलेल्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच त्याचा प्राण गेला. कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्ग या चौकातून जात असल्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. रस्त्यालगत हातगाड्या उभ्या असणे, दुकानदारांची गर्दी आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे कोरडगाव चौक सातत्याने अपघातांचे केंद्रबिंदू बनलेला आहे. यापूर्वीही या चौकात अनेक अपघात (Accident) घडले असून, नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली होती.

घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. त्यानंतर संबंधित ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी कोरडगाव चौकातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

अपघातस्थळी आईचा हृदयद्रावक आक्रोश
पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवर काही वेळापूर्वीच विकासने आपल्या आईला सोडले होते. मात्र, काही क्षणांतच दुर्दैवी अपघातात विकासचा मृत्यू झाला. कोरडगाव चौकात गर्दी पाहून विकासची आई तिकडे गेली आणि समोर दिसलेले दृश्य पाहून तिने टाहो फोडला. कारण त्या अपघातात मृत्यू झालेला युवक तिचा स्वतःचा मुलगा होता. हा क्षण उपस्थित सार्‍यांच्या काळजाला चटका लावणारा ठरला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai भाजपचे शीर्षस्थ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या, शुक्रवारपासून दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या, रात्री पुण्यातील मुक्कामानंतर...