पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
मोहटे (Mohote) गावात दुचाकी व आयशर टेम्पोची समोरा समोर धडक (Bike and Tempo Accident) होऊन यात दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाला आहे. शेषराव परमेश्वर सानप (वय 34 रा. आनंदगाव ता. शिरूर जि. बीड) असे अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाथर्डी-बीड या राज्य महामार्गावर (Pathardi Beed Highway) बुधवारी सकाळी मोहटे गावातील धोकादायक वळणावर पाथर्डीहून बीडच्या दिशेने जाणार्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली.
त्यात सानप याचा जागीच मृत्यू झाला. मयत शेषराव सानप हा चालक म्हणून मोठ्या वाहनावर पुणे (Pune) येथे नोकरी करत होता. बुधवारी सकाळी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील आनंदगाव येथून पाथर्डी (Pathardi) मार्गे पुण्याकडे जात असताना ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सुहास गायकवाड हे अपघाताचा तपास करीत आहे.