Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपेट्रोल भरताना आला कॉल, दुचाकीस्वाराने मोबाईल काढला अन्...

पेट्रोल भरताना आला कॉल, दुचाकीस्वाराने मोबाईल काढला अन्…

मुंबई | Mumbai

पेट्रोल आणि डिझेल हे अतिज्वलनशील पदार्थ असल्याने ते हाताळताना आवश्यक ती काळजी खबरदारी घ्यावी लागते. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करून पंपावर पेट्रोल भरताना उचललेला मोबाईलवरील एक काॅल तुमचे आयुष्य स्वीच ऑफ करण्यास कारणीभूत ठरू शकतो. अनेकदा लोक अशा हलगर्जीपणामुळे स्वतः सोबत दुसऱ्यांचे ही आयुष्य पणाला लावतात.

- Advertisement -

अशीच घटना नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. एक दुचाकीस्वार गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबताना विचित्र घटना घडली. पेट्रोल भरायला आलेला दुचाकीस्वार गाडीत पेट्रोल भरत असताना मोबाईलवर आलेला कॉल उचलत असताना अचनाक पेट्रोलने पेट घेतला.

पेट्रोल भरणारा वेळीच गाडीवरुन उतरला, त्याच प्रमाणे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही तर मोठी दुर्घटना घडली असती. ही आग मोबाईलमुळे लागली की उष्णतेमुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, ही सगळी घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

मात्र, पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलणे, सिगारेट पिणे, आणि अशा अनेक बाबी टाळणं वाहनचालकांनी आणि त्यांच्यासोबतच्या प्रवाशांनी आवर्जून टाळाव्यात हे मात्र नक्की.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik : संतापजनक! वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर बळजबरीने नाचवलं; गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या