धुळे । dhule। प्रतिनिधी
धुळे- चाळीसगाव महामार्गावरील विंचुर शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात काल सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनावरील चालकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चरणदास रामसिंग पवार (वय 32) असे मयत तरूणाचे तर देशमुख दिनकर पवार (रा. कुंडाणे वेल्हाणे ता. धुळे) असे जखमीचे नाव आहे. दोघे काल दि. 26 रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास एमएच 18 एडी 0187 क्रमांकाच्या दुचाकीने विसापुर (ता. चाळीसगाव) येथे जात होते. त्यादरम्यान त्यांच्या दुचाकीला विंचुर शिवारातील हॉटेल वैभवसमोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
त्यात चरणदास पवार हा ठार झाला. तर देशमुख पवार हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर धडक देणारा अज्ञात वाहनावरील चालक पसार झाला. याबाबत समाधान रमेश पवार यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.