जळगाव jalgaon । प्रतिनिधी
भरधाव आयशरच्या (Eicher accident) धडकेत सोपान विठ्ठल साबळे (वय-44) रा. विटनेर ता.जि.जळगाव या दुचाकीस्वार (Bike rider) शेतकर्याचा जागीच मृत्यू (killed) झाल्याची घटना बुधवारी विटनेर-जळके रस्त्यावर घडली. याप्रकरणी आयशर चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअपगुर्जर समाजाने केला हा आदर्श ठराव
जळगाव तालुक्यातील विटनेर येेथे सोपान साबळे हे आपल्या पत्नी व मुलांसह वास्तव्यास असून ते शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी ते शेतात दुचाकीने गेले होते. दरम्यान, दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाले. दरम्यान जळके ते विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने येणार्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोपान साबळे यांचा मृत्यू झाला.
Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेदपत्नीचा खून करणार्या पतीला जन्मठेपMakeup Part 4 # असा करा Self makeup
गुन्हा दाखल
परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. याबाबत बुधवारी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप