Monday, September 7, 2026
Homeक्राईमAhilyanagar : नगरसह इतर जिल्ह्यांतून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद

Ahilyanagar : नगरसह इतर जिल्ह्यांतून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून आठ लाख 70 हजार रूपये किमतीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ओमकार ऊर्फ भैय्या शैलेश रोहम (वय 20 रा. रांजणगाव रस्ता, ता. राहाता), सोनु सुधाकर पवार (वय 24 रा. साकुरी, ता. राहाता) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

- Advertisement -

विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातम्यांची खातरजमा आणि तपासाच्या माध्यमातून ही कामगिरी केली. गुप्त माहितीच्या आधारे 26 मे रोजी राहाता-पिंपळस रस्त्यावर सापळा रचून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी एक साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक) याच्या मदतीने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी चोरी केलेल्या दुचाकी देहेगाव (ता. राहाता) येथील काटवनात लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तिथे धाड टाकून एकूण आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. राहाता, श्रीरामपूर शहर, येवला शहर, विमानतळ, पुणे शहर, नांदगाव, नाशिक या ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकच्या वॉर्ड क्रमांक सातचा राष्ट्रीय गौरव; स्वच्छ हवा...

0
नवी दिल्ली | New Delhi शहरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली...