Monday, June 24, 2024
Homeनगरसराईत दुचाकी चोराला अटक; कोतवाली पोलिसांची कामगिरी

सराईत दुचाकी चोराला अटक; कोतवाली पोलिसांची कामगिरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शहरासह उपनगरातून दुचाकी चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. माळीवाडा परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक केली असून 90 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विनोद कडुबा सरकाळे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) असे त्यांचे नाव आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणार्‍या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलिसांना सूचना केल्या होत्या. माळीवाडा परिसरात दुचाकी चोरी करणारा सराईत असल्याची माहिती निरीक्षक यादव यांना मिळाल्यानंतर त्याला सापळा लावून शिताफिने ताब्यात घेतले.

शहरातील गौरी घुमट येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली असून, त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यादव, अंमलदार शाहिद शेख, रवींद्र टकले, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दीपक रोहकले, नितीन शिंदे, राहूल गुंड यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या