Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

शहरातील गंगाधरी बायपास येथे कंटेनरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

मूळडोंगरी येथील गणपत शहादू मुकणे हे आपल्या मुलीस नेहमीप्रमाणे शासकीय आयटीआय येथे घेण्यासाठी दुचाकी क्रमांक एम.एच. १७ वाय. ८७५५ वरून जात होते. या दरम्यान समोरून आलेल्या आर.जे.-३१-जीडी-१३८६ या कंटेनरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नसल्याने शवविच्छेदनात अडथळा निर्माण झाला होता.

मात्र सायंकाळी नातेवाईकांनी रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...