Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

कंधाणे । वार्ताहर Kandhane

नामपूरकडून सटाण्याकडे येत असलेल्या दोंडाईचा-नाशिक बसने सटाणा चौगाव फाट्यावर दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात बिजोरसे येथील दुचाकीस्वार सोमनाथ अशोक बोरसे गंभीररित्या जखमी झाले.

- Advertisement -

दोंडाईचा आगाराची बस क्र. एम.एच.-२-बी.एल.-१९५१ नामपुरहून सटाण्याकडे जात असतांना समोरून येणाऱ्या सोमनाथ बोरसे यांच्या दुचाकीला बसने धडक दिली. या धडकेत दुचाकी बसच्या पुढच्या चाकात अडकल्याने ती जवळपास २० ते ३० फूट फरपटत गेली. बोरसेही दुचाकीसोबत बसखाली अडकल्याने फरफटत गेले.

YouTube video player

बसखाली अडकल्याने बोरसे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्यांना बाहेर काढत उपचारासाठी रूग्णालयात हलविले. या अपघातामुळे या मार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सटाणा पोलीस ठाण्यात बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fire News : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

0
सिन्नर | वार्ताहर | Sinnar तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी (Malegaon MIDC) परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला आज अचानक भीषण आग (Fire) लागल्याची...