Saturday, May 18, 2024
Homeनगरबर्ड फ्ल्यू : भरपाईपोटी 5 लाख 36 लाखांचा निधी प्राप्त

बर्ड फ्ल्यू : भरपाईपोटी 5 लाख 36 लाखांचा निधी प्राप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात काही दिवसांत बर्ड फ्ल्यूने आपले हातपाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. तिन वेगवेगळ्या ठिकाणी मृत कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह

- Advertisement -

आल्यानंतर त्या ठिकाणी असणार्‍या बाधित साडेपाच हजार कोंबड्या, अंडी आणि खाद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. दरम्यान या ठिकाणीच्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा केल्याने संबंधीत पक्षी पालकांसाठी 5 लाख 36 हजार रुपयांची भरपाई मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन आणि अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत विविध पक्ष्यासोबत कोंबड्या मृत पावलेल्या आहेत. मृत पावलेल्या कोंबड्यांसह अन्य पक्षांचे नमुने पुणेच्या राज्यस्तरीय आणि भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. आतापर्यंत पाठविलेल्या 23 नमुन्यांपैकी 5 नमुन्यांचा अहवाल आला असून यातील 3 अहवाल बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आहेत. तर दोन अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालापैकी चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील 638 कोंबड्या, सडे (ता. राहुरी) येथील 2 हजार 179 कोंबड्या, शिंदोडी (ता. संगमनेर) येथील 2 हजार 628 कोंबड्या आणि मांडवे (ता. पारनेर) येथील 73 कोंबड्या, अंडी आणि खाद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या ठिकाणी पक्षी पालकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याच्या पशूसंवर्धन विभागाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानूसार जिल्ह्यासाठी 5 लाख 36 हजारांची मदत मंजूर होवून ती वर्ग झालेली असल्याचे सभापती गडाख आणि पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.

…………………..

असा मदतीचा निकष

बॉयलर पक्षी शुन्य ते सहा आठवडे 20 रुपये प्रती पक्षी आणि सहा आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास 70 रुपये प्रती पक्षी.

अंडी देणारे पक्षी शुन्य ते आठ आठवडे रुपये प्रती पक्षी आणि आठ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास 90 रुपये प्रती पक्षी.

पक्षी खाद्य 12 रुपये प्रती किलो.

अंडी 3 रुपये प्रती नग.

……………..

- Advertisment -

ताज्या बातम्या