मुंबई | Mumbai
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्षाने मोठे यश संपादन केले आहे. एकीकडे महापौरपदाच्या सोडती जाहीर होत असतानाच दुसरीकडे राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. सत्तेसाठी भाजपने थेट एमआयएम पक्षाशी युती केली आहे. निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर सडकून टीका करत होते. काहीही झाले तरी भाजपसोबत जायचे नाही, अशी भूमिका एमआयएमचे अध्यक्ष असदद्दीन ओवेसी यांनी घेतली होती. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे.
भाजपकडून एमआयएम नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद देण्यात आले आहे. एमआयएमचे ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २ आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एमआयएमच्या ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या २ आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत जात सत्ता स्थापन करण्यात आली आहे. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एमआयएम आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या आहेत. कधीही एमआयएम आणि भाजपा एकत्र येईल, असा साधा कोणी विचारलही केला नाही. मात्र, अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे प्रत्यक्षात ठरले आहे.





