Saturday, November 9, 2024
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणुकांसाठी भाजपची पक्षबांधणी ; महाराष्ट्रातील नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

आगामी निवडणुकांसाठी भाजपची पक्षबांधणी ; महाराष्ट्रातील नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

आगामी लोकसभा तसेच विधानसभेच्या (Loksabha and Vidhansabha Elections) दृष्टीने देशातील राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाकडून (BJP) पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात येत असून आता राष्ट्रीय पातळीवर भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

भाजपच्या या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे (Vinod Tawade), विजया राहटकर (Vijaya Rahatkar) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना स्थान देण्यात आले आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याआधी भाजपकडून राज्य पातळीवरही मोठे बदल केले गेले होते. काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

घाटातून जाणे पडले महागात ; नियंत्रण सुटल्याने कार थेट कोसळली धरणात

भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये राष्ट्रीय संगठन महामंत्रिपदाची जबाबदारी बी. एल. संतोष यांच्याकडे सोपावण्यात आली आहे. तर राष्ट्रीय सह-संगठन महामंत्रिपदी शिवप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामंत्रिपदी महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या