Monday, June 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने रविवारी रात्री उशीरा ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. अपेक्षेनुसार भाजपने अहिल्यानगर मतदारसंघातून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे. तर जळगावमधून नंदकिशोर महाजन यांना तिकीट देण्यात आले आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अमर राजूरकर यांना नांदेडमधून तर धाराशिव – लातूर – बीडमधून माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूरमधून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीत डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी मिळाली आहे.

भाजपने वर्धा – चंद्रपूर – गडचिरोलीतून अरुण लखाणी, भंडारा – गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे – पाटील, सांगली – सातारामधून धैर्यशील कदम तर छत्रपती संभाजीनगर – जालनामधून सुहास शिरसाट यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : कोपरगावात विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon कोपरगाव शहरात विनापरवाना बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 ब्रास वाळू...