Monday, June 24, 2024
Homeजळगाव‘ट्रांझिट’अवस्थेत खडसेंकडून भाजपाचा प्रचार!

‘ट्रांझिट’अवस्थेत खडसेंकडून भाजपाचा प्रचार!


यावल -प्रतिनिधी
जिल्ह्यातील हेविवेट नेते आ.एकनाथराव खडसेंनी अखेर भाजपाचा जाहीर प्रचार सुरु केला आहे. आ.खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.)चा राजिनामा दिला असून भाजपाने अद्याप त्यांना प्रवेश दिलेला नाही. खडसे सध्या ट्रांझिट अवस्थेत आहेत. प्रवेशाआधीच त्यांनी रावेर मतदारसंघात भाजपाचा प्रचार सुरु केला आहे.

- Advertisement -


लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आ.खडसे यांनी यावल शहरासह तालुक्यात आठ ते नऊ गावांना भेटी देऊन नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी रक्षा खडसे यांना विजयी करावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.


खडसे यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून स्वगृही भाजपात येण्याचा मनोदय व्यक्त केला होता. राष्ट्रवादीचा राजीनामाही त्यांनी दिला आहे. १५ दिवसात दिल्लीत भाजपा प्रवेश होईल असे आ.खडसेंनी जाहीर केले होते. मात्र ही मुदत उलटली तरी भाजपाच्या केद्रीय नेतृत्वाने आ.खडसेंना जवळ केलेले नाही. आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असल्याने कोणत्याही पक्षाचा प्रचार करु शकतो असे आ.खडसेंनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. माघारीचा मुहूर्तही टळून गेल्याने आता खडसेंनी भाजपाचा प्रचार सुरु केला आहे. रावेर मधून आ. खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपाच्या उमेदवार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या