Saturday, August 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपची पाच जणांची यादी जाहीर

मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपची पाच जणांची यादी जाहीर

पंकजा मुंडेंसह 'यांना' मिळाली संधी

मुंबई | Mumbai

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) रिक्त झालेल्या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या (दि.२) जुलै शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र, राज्यातील माहायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. अशातच आता महायुतीमधील भाजपच्या (Bjp) पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

- Advertisement -

यामध्ये बीड लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या सहा हजार मतांनी पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचे विधान परिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले आहे भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी दिली आहे. दरम्यान विधान परिषदेसाठी महाराष्ट्र भाजपने (BJP) पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे १० नावे पाठवली होती.

त्यातील पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) या पाच जणांच्या नावांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान (Voting) होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १५ ऑगस्ट २०२६ – लोकशाहीची नवी क्षितिजे

0
स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा टप्पा मागे सोडत आज देश आपल्या स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त झालेला हा...