विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात ही निवडणूक रंगणार असली तरी यापूर्वीच भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेनेच्या निलम गो-हे दुस-यांदा विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाचा विरोध डावलून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घाईघाईने जाहीर करण्यात आली आहे.भाजपतर्फे ज्येष्ठ नेते विजय उर्फ भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र ही निवडणूक सद्यस्थितीत होऊ नये यासाठी भाजपाने न्यायालयात धाव घेतली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंध असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनातही विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यास भाजपचा आक्षेप आहे. भाई गिरकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांना कोकणात मोठा जनाधार आहे.आमदार भाई गिरकर यांनी आज विधिमंडळात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार सुरेश धस, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.