अहमदनगर | Ahmednagar
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका ऑडिओ क्लिपने (Parner Tehsildar Jyoti Devre Audio clip) सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या (Parner) लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिला होता.
Video : पारनेर ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट, पाहा नेमकं काय म्हणाल्या तहसीलदार देवरे
या प्रकरणामुळे भाजपला (BJP) मुद्दा मिळाला आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Devre) यांची भेट घेतली. या भेटीवेळी वाघ यांनी तहसीलदारांना ‘रडने का नही, भिडने का’ असे म्हणत आलिंगनही दिले. तसेच आम्ही सर्व तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं. यामुळे वाघ यांनी लंकेंविरोधात (Nilesh Lanke) दंड थोपटल्याचं बोललं जात आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांची व्हायरल ऑडिओ क्लिप
तहसीलदार देवरेंविरोधात कर्मचार्यांनी थोपटले दंड
दरम्यान महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिले. मात्र आता देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या हाताखालील कर्मचारीच आता देवरे यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यांनी तहसील कार्यालयासमोरच बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटना (Parner Taluka Revenue Employees and Talathi Association) तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकार्यांनाही मागणीचे निवेदन दिले होते. या निवेदनातून तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वांच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा, अशी मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण होत नसल्याने पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकार्यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.
तहसीलदार देवरे या कर्मचार्यांवर दडपशाही करतात, दबाव टाकतात, सूड भावनेची वागणूक देतात असे आरोप करत त्यांच्या विरोधात महसूल सहाय्यक व पारनेर तलाठी कर्मचारी संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनात महेंद्र रोकडे, एस.यू. मांडगे, एम.आर.उडे, पी.बी.जगदाळे, डी.डी.पवार, एस. एस.गोरे, ए.ल निकाळजे, रविंद्र शिंदे, ए.एम गायकवाड, डी. यु चव्हाण, व्ही.व्ही वैराळकर, ए.के लांडे, एस.ई पवार, बी.एम कुसमुडे, डी.डी कदम, ए.बी मंडलिक आदीसह महसूल सहाय्यक व तलाठी कर्मचारी संघटना पारनेर चे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे.