Monday, July 1, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप कोअर कमिटीची मध्यरात्रीपर्यंत चालली महत्वाची बैठक; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं सविस्तर…

भाजप कोअर कमिटीची मध्यरात्रीपर्यंत चालली महत्वाची बैठक; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं सविस्तर…

मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही, पण आता काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहे. या पार्श्वभुमीवर राज्यातल्या सर्वच पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सायंकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. मध्यरात्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीबद्दल माहिती दिली.

- Advertisement -

या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, विनोद तावडे, माजी खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते. या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

ही बैठक संपल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जो निकाल समोर आला त्या निकालाचे विश्लेषण या बैठकीत करण्यात आले. महाविकास आघाडी आणि खासकरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अपप्रचार करून मतं मिळविली. भाजपा संविधान बदलणार, असा खोटा प्रचार केला. आदिवासी समाजाला सांगितले की, तुमचे हक्क हिसकावले जाणार. महिलांना सांगितले की, प्रत्येक महिना खटा खट साडे आठ हजार रुपये देणार. असा खोटा प्रचार केल्यामुळे भाजपाला फटका बसला”, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.

पुढे ते असे ही म्हणाले की, “लोकांच्या मागण्यांबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहे. आता विधान परिषदेतील ११ जागांबाबत निवडणूक होणार आहे. त्यावरही आम्ही चर्चा केली. आम्हाला मिळालेल्या जागांच्या उमेदवारीवर चर्चा केली. आम्ही काही नाव ठरवली आहेत ती नाव केंद्राला पाठवणार आहे, त्या नावांवर केंद्रात चर्चा करुन अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला. पण आता लोकांना सत्य कळले आहे. केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असेल तर जनतेचा फायदा होतो. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राच्या योजना थांबविल्या जातील. केंद्र सरकार राज्याला मदत करू इच्छिते, पण राज्य सरकारने योग्य सहकार्य न केल्यास राज्याच्या जनतेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आजच्या बैठकीत विधानसभेच्या अनुषंगानेही चर्चा झाली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या