गुजरात | Gujarat
अनेक निवडणुकीत भाजपकडून धूळ खाणाऱ्या कॉंग्रेसने(congress) गुजरातमध्ये भाजपाला(bjp) जोरदार धक्का दिला आहे. गुजरातमधील ही निवडणूक दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. गुजरातमधील
अमूल डेअरी (amul dairy) नावाने प्रसिद्ध असलेल्या कायरा डिस्ट्रिक्ट कोआपरेटिव मिल्क प्रोडक्शन यूनियन लिमिटेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर निवडणूकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. तर काँग्रेसने(congress) मात्र एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत एकूण ११ जागांपैकी काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे अमूल डेअरी काँग्रेच्या एकहाती ताब्यात गेली आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले तर आज मतमोजणी झाली.
या निवडणुकीसाठी भाजप उमेदवार आ. केसरसिंह सोलंकी यांना काँग्रेसच्या संजय पटेल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पटेल यांनी २०१७ मध्ये सोळंखी यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढली होती. आनंद येथून काँग्रेस आमदार कांती सोढा परमार हे ४१ मतांनी विजयी झाले आहेत. बोरसद येथून काँग्रेस आमदार राजेंद्रसिंह परमार बोरसद अंचल सीट येथून विजयी झाले. परमार हे अमूलचे उपाध्यक्षही राहिले आहेत. काँग्रेस पक्षातील इतर विजयी उमेदवारांमध्ये खम्भात येथून सीता परमार, पेटलाद येथून विपूल पटेल, कथलल येथून घीला जला, बालासिनोर येथून राजेश पाठक आणि महमदवद येथून गौतम चौहान आदी उमेदवार विजयी झाले आहे.