Saturday, May 4, 2024
Homeराजकीयधुळ्यात भाजपातर्फे काळे झेंडे दाखवून निदर्शने

धुळ्यात भाजपातर्फे काळे झेंडे दाखवून निदर्शने

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

राज्य शासनाने स्वातंत्र्याची गळचेपी केल्यामुळे सरकारचा भाजपातर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

हे आंदोलन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

याबाबत भाजपाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या राज्य शासन कोणत्या प्रकारे राज्य चालवित आहे. हे कळेनासे झाले आहे.

सरकारच्या चुका दाखवूनही, सरकारच्या विरोधात लिहिणे, बोलणे हे गुन्हा ठरत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात हुकूमशाही सारखे तीन पक्षाचे सरकार राज्य करत आहे.

लोकशाहीच्या चौथा स्तंभ असणार्‍याला देखील आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना एका गुन्ह्याच्या बंद झालेल्या फाईल पुन्हा काढून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. असे पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या