Friday, April 4, 2025
HomeनगरBJP : भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्ष निवडी 25 एप्रिलपर्यंत होणार

BJP : भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्ष निवडी 25 एप्रिलपर्यंत होणार

प्रदेश पदाधिकारी चौधरी, अनासपुरे यांची माहिती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत नगर जिल्ह्यातील उत्तर नगर, दक्षिण नगर व नगर शहर महानगर जिल्हाध्यक्ष अशा तीनही प्रमुख पदाधिकार्‍यांच्या निवडी 15 ते 25 एप्रिलदरम्यान होणार आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात येत्या तीन दिवसात प्रत्येकी 10 हजार सदस्य नोंदणी करण्याचेही प्रदेश पदाधिकार्‍यांद्वारे सांगण्यात आले.

- Advertisement -

प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी व विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा नगरला घेण्यात आला. यावेळी नगर शहर व परिसरातील नगर शहर, मध्य नगर शहर, भिंगार व केडगाव या चारही मंडलांची पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदस्य नोंदणी अभियानात उत्तर महाराष्ट्रात 28 लाखांचे सदस्य नोंदणी उद्दिष्ट आहे. यात नगर जिल्ह्यात 8 लाख सदस्य झाले आहेत. यात नगर शहरात 72 हजार प्राथमिक सदस्य झाले आहेत.

यात आणखी सुमारे सव्वा लाख सदस्य उद्दिष्ट वाढवण्यात आले असल्याने येत्या तीन दिवसांत जिल्ह्यातील बाराही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी 10 हजार सदस्य करण्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात 1 कोटी 51 लाखांची सदस्य नोंदणी उद्दिष्ट असून, आतापर्यंत 1 कोटी 47 लाखापर्यंत नोंदणी झाली आहे. ती येत्या तीन दिवसात आणखी 4 लाखाने वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, मंडल पदाधिकारी व सदस्य निवडींसह तिन्ही जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने भाजपअंतर्गत खुषीचे वातावरण पसरले आहे. प्रमुख पदाधिकारी होऊ इच्छिणारांकडून नेतेमंडळींकडे लॉबिंग लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कृषी विभागाने सुरू केले व्हॉटसअ‍ॅप चॅनेल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान व सरकारी योजनांची प्रभावी माहिती पुरविण्यासाठी कृषि विभागाने जिल्ह्यासाठीचे व्हॉटसअ‍ॅप चॅनेल सुरू केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते...