Friday, August 28, 2026
HomeनगरNewasa : नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला

Newasa : नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला

अतिक्रमण कारवाईवरून जमाव आक्रमक || परिस्थिती नियंत्रणात

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा शहरात नगरपंचायत समोरील फळ विक्रीच्या हातगाड्याचे स्थलांतरण करण्यावरून प्रशासकीय मोहिमे दरम्यान तणाव निर्माण झाला. दरम्यान, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या गाडीवर संतप्त जमावाने तोडफोड केली. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांसाठी खुला करावा, या मागणीचे निवेदन ऋषिकेश शेटे यांनी नगरपंचायतीला दिले होते. नगरपंचायत प्रशासनाने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांच्या मदतीने खोलेश्वर गणपती मंदिर चौक ते नगरपंचायत परिसरातील रस्त्यावरील फळ विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेवर स्थलांतरित होण्याची सूचना देण्यास सुरुवात केली.

यावेळी तेथे फळ विक्रेते व स्थानिकांचा मोठा जमाव जमा झाला. या जमावाने प्रशासकीय कारवाईला तीव्र विरोध दर्शवत रोष व्यक्त केला. वाद सुरू असतानाच निवेदनकर्ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे हे चारचाकी वाहनाने त्या ठिकाणाहून जात असताना जमाव आक्रमक झाला व संतप्त जमावाने त्यांच्या गाडीला घेराव घातला. जमावातील काही लोकांनी गाडीची तोडफोड केली. उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी जमावाला पांगवत शेटे यांचे वाहन त्या ठिकाणाहून बाहेर काढले. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलिस कर्मचार्‍यांनी तात्काळ हस्तक्षेप करत बळाचा वापर केला आणि आक्रमक जमावाला पांगवले.

या संपूर्ण प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तातडीने नेवासा पोलीस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच सुरक्षेचा व तपासाचा सविस्तर आढावा घेत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे नागरिकांना आव्हान त्यांनी केले आहे. या घटने नंतर ही शहरातील बाजारपेठत शांततेत व सुरळीत सुरू होती. नेवासा शहरात घडलेली घटना नियंत्रणात आणण्यात आलेली आहे.आम्ही सर्व नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन करत आहोत कोणीही कायदा हातात घेऊ नये; अन्यथा संबंधितांविरोधात कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक मुक्का सुदर्शन स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दहा वर्षांच्या अटीमुळे निवडणुकीतून बाहेर पडलेल्यांना संधी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सहकार संस्था निवडणूक नियम 2014 च्या 10 मधील...