Thursday, April 3, 2025
Homeजळगावपक्षवाढीत खडसेंचे योगदान मोठे ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन

पक्षवाढीत खडसेंचे योगदान मोठे ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन

मुंबई । वृत्तसंस्था

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजप पक्ष मोठा करण्यामध्ये एकनाथराव खडसेंचा वाटा मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील भाजपची संघटनात्मक बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

महाराष्ट्रात भाजपचे जे संघटन आज उभे राहिले आहे, त्यामध्ये एकनाथराव खडसेचे योगदान मोठे आहे. गेल्या तीस वर्षात कोणत्याही एका पक्षाला विधानसभा निवडणुकीत 100 हून अधिक जागा जिंकणे शक्य झाले नव्हते, ते भाजपने करुन दाखवले. यामध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह एकनाथराव खडसेंचा मोठा वाटा आहे.

खडसेंनी विरोधी पक्षात असताना अत्यंत प्रभावीपणे काम केले. खडसे भाजपचे नेते आहेत. माणसे रागावतात त्यावेळी ते व्यक्त होतात. एकनाथराव खडसे भाजप सोडण्याचा विचार करणार नाहीत, असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले. येत्या 2022 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं हे भाजपचं उद्दीष्ट आहे.

त्यामुळे मुंबईच्या बाबतीत लहान-लहान गोष्टींचा विचार आम्ही करत आहोत. येत्या 15 डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्ष, 20 डिसेंबरपर्यंत विधानसभा क्षेत्र, 25 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि 30 डिसेंबरपर्यंत मुंबईच्या अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पुन्हा एकदा गणवेश वितरणाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील शासकिय शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात सातत्याने बदल होत आहेत. मागील वर्षी तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी...