Saturday, May 4, 2024
Homeधुळेधुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी भाजपतर्फे अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी भाजपतर्फे अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

धुळे – dhule

धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षा तर्फे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि.23 नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.

- Advertisement -

तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

त्यापूर्वी श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस (गुरुद्वारा मागे) येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, धुळे महापौर प्रदीप कर्पे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ.गिरीष महाजन, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, भाजपा संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.सुभाष भामरे, खा.डॉ.हिनाताई गावित, उमेदवार माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासह आमदार काशिराम पावरा, आमदार राजेश पाडवी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर भगवान गवळी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मकरंद पाटील, अजय परदेशी, शिवाजीराव दहिते, कुसुमताई निकम, धरती देवरे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, कामराज निकम, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सुभाष देवरे, मनोहर भदाणे, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल, डॉ. सुप्रिया गावित, सुरेश पाटील, बापू खलाणे, नबू पिंजारी, जितेंद्र सूर्यवंशी, संग्राम पाटील, संजय जाधव, दीपक भोसले, सुनिल बैसाणे, देवेंद्र पाटील, किशोर माळी वाघाडी, हेमंत पाटील, प्रतिभा चौधरी, प्रा. अरविंद जाधव, हिरामण गवळी, नरेंद्रसिंह सिसोदिया, राहुल रंधे, बंटी मासुळे, भिकन वारुडे, राजेंद्र देसले, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, शीतल नवले, भाऊसाहेब देसले, विजय पाटील, सत्तरसिंग पावरा, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या