रावेर|प्रतिनिधी Raver
कृषी विधेयकाच्या अनुषंगाने सरकारकडून मध्यस्थ हटवल्याचा दावा होतोय मात्र तुम्ही मध्यस्थ हटवून त्यांच्या जागी मोठे भामटे निर्माण केले याबाबत का सांगत नाहीय .कृषी माल खरेदी करून साठा करायचा आणि भाव वाढल्यावर त्या मालाला चढ्याभावाने विकायचा असे चित्र या कृषी विधेयकाने निर्माण होणार आहे. याबाबत
आता पान केवळ स्वाक्षरी मोहीम नाही तर कृषी विधेयेकाचे नुकसान देखल लोकांना माहिती करणे द्यावे लागेल यासाठी कार्यकर्त्यांनी बोट चेपी भूमिका न ठेवता,स्पष्टपणे विधेयकाचा विरोध करण्याची भूमिका मांडवी अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
येथील कॉंग्रेस कार्यालयावर झालेल्या स्वाक्षरी मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रास्ताविक मांडले. आमदार चौधरी पुढे म्हणाले की, व्हर्चुअल रॅलीनंतर कॉंग्रेसच्यावतीने स्वाक्षरी मोहीम राबवून,केंद्र सरकारने शेतकरी हिताविरुद्ध निर्माण केलेले काळे कायदे शेतकऱ्यांची गळचेपी करतील याबाबत जनजागरण करण्यासाठी हि मोहिमे राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिजाबराव चौधरी, महिला आघाडीच्या मनीषा पाचपांडे,मानसी पवार,कांता बोरा, नामदेव महाजन.प्रकाश सूरदास,विनायक महाजन, महेश लोखंडे,राजू सवर्ण,भूपेश जाधव, संतोष महाजन, दिलरुबाब तडवी, विनोद चौधरी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
भाजपला सत्तेचा माज चढलाय
कृषी विधेयकाबाबत जनसामान्य जनता,शेतकरी भरडले जाणार आहे,मात्र केंद्र सरकार यांचा विचार न करता मोठ मोठ्या व्यापाऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी कृषी विधेयक संख्याबळाच्या जोरावर लोकांवर लादत आहे, या सरकार ला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जनसामान्य लोकांना यांच्यापासून होणारे नुकसान समजावून सांगितली पाहिजे.याविरुद्ध बोटचेपी भूमिका न ठेवता स्पष्टपणे विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे.केंद्र सरकारला सत्तेचा माज चढल्याचे त्यांनी यावेळी विधान केले.