Monday, January 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBJP Mumbai: मुंबईत महापौर पदावरुन हालचालींना वेग; भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना महत्वाचा आदेश

BJP Mumbai: मुंबईत महापौर पदावरुन हालचालींना वेग; भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना महत्वाचा आदेश

मुंबई | Mumbai
मुंबईमध्ये महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आत सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही सत्तास्थापनेसाठी त्यांना शिंदेंच्या सेनेची गरद पडणार हे नक्की. त्यामुळेच सेनेच्य उमेदवारांचाही भाव वाढला असून त्या सर्वांना संध्या मुंबईतील मोठ्या, पंचतारांकित हॉटेलमध्येच ठेवण्यात आलं आहे. अशातच भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत.

यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेत २२७ पैकी सर्वाधिक नगरसेवक हे भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुतीचे निवडून आले आहे. भाजपचे ८९ आणि शिवसेना शिंदे गटाचे २९ असे एकूण ११८ नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. पण अद्यापही महापौरपदाचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत महापौरपदाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत म्हणजेच पुढील आठ दिवस नवनिर्वाचित नगरसेवकांनी मुंबईबाहेर जाऊ नका, असे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच महापौरपदाची सोडतही जाहीर होऊ शकते आणि यासंदर्भात आदेश काढला जाऊ शकतो. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणीही शहर सोडू नये, असे सक्त आदेशच भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जशी महापौरपदाची सोडत जाहीर होईल, तसे लगेचच भाजपकडून महापौरपदासाठीचा दावा करण्यात येणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

YouTube video player

मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत. याच आठवड्यामध्ये नगर विकास विभागाकडून मुंबईच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्यानंतर भाजपा स्वतः स्थापनेसाठी दावा करू शकते. त्यामुळे पुढील एकूणच आठ दिवसांसाठी कोणत्याही नवनिर्वाचित नगरसेवकाने मुंबई बाहेर जाऊ नये, अशी सूचना पक्षाकडून देण्यात आली आहे.

ठाकरेंचे नगरसेवक राज ठाकरेंची भेट घेणार
तब्बल २० वर्षांनी एकत्र येत मुंबई महापालिकेत युती करून ठाकरे बंधुंनी निवडणुक लढवली. बीएमसी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला ६५ तर मनसेला ६ जागा मिळाल्या. शनिवारी मनसे पक्षाच्या नगरसेवकांनी राज व शर्मिला ठकरे यांची भेट घेतली. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

याचदरम्यान आज एक मोठी अपडेट समोर आली असून, ठाकरे सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक राज ठाकरे याच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी येणार असून तेथे ते राज यांची भेट घेतील.

हॉटेल पॉलिटिक्स
शिंदे गटातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालिकेतील ‘गट’ आज स्थापन केला जाण्याची शक्यता आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया ही आज करून गट नेत्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गट नेत्यांच्या यादीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले सारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे. आज गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटीबाबत निश्चिंत राहता येईल. त्या अनुषंगाने शिवसेनेत हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Accident News : खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा भीषण अपघात; चौघे...

0
नाशिक | Nashik जिल्ह्यातील मालेगाव–मनमाड महामार्गावरील (Malegaon-Manmad Highway) वऱ्हाणे गावाजवळ आज (सोमवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना...