मुंबई | Mumbai
काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारल्याची घटना घडली होती. याचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटले. यानंतर शिवसेना नेते व खासदार यांनी या प्रकरणावरून प्रतिक्रिया देताना म्हंटले होते की, “महाराष्ट्र हे कायद्याच राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही, यावरून भाजप नेते व आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
काय म्हंटले आशिष शेलार?
आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन … ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलीसांवर हल्ला…आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण…पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया..पण, “इथे कायद्याचे राज्य” आहे ना?कि एका बबड्याच्या फायद्याचे?.”
काय होते प्रकरण ?
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे.