Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना संकट संपल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप – चंद्रकांत पाटील

करोना संकट संपल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप – चंद्रकांत पाटील

सार्वमत

बाळासाहेब थोरात, एकनाथ खडसेंवरही टीका
मुंबई – करोनाचं संकट संपल्यानंतर देशामध्ये तसंच राज्यातही काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचा दावा भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. माणूस रागावतो, पण खडसेंनी जाहीरपणे रागवायला नको. ते आमचे बाप आहेत. त्यांच्या फंद्यात पडू नका, ती आग आहे. तुम्ही तुमची माणसं सांभाळा, असं देखील पाटील म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागत करु असं म्हणत भाजपला जनमानसाचा आधार असलेला नेता नको असतो. भाजपत लोकशाही नाही हे खडसेंच्या उशीरा लक्षात आलं. भाजपत बहुजन नेत्यांचा प्रभाव वाढू दिला जात नाही, असा आरोप केला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाळासाहेब थोरात तुम्ही तुमचा पक्ष जपा, तुम्हाला कुठेही भवितव्य नाही. राजघराण्यातील जोतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला जपता आलं नाही. तर इतरांना काँग्रेस काय सांभाळणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
करोना संपल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काय भूकंप होणार याची हालचाल तुम्हाला कळली आहे.

तुम्हाला अंदाज आला आहे. तुमची माणसं जपा. खडसेंचं तुम्ही सोडाच. ज्योतिरादित्य गेले, आता एक तरुण माणूस अजून काँग्रेस सोडून जाणार आहे, त्यानंतर एक सिनियर माणूस देखील जाणार आहे. देशातले दोन तरुण काँग्रेस कार्यकर्ते आणि एक ज्येष्ठ कार्यकर्ता भाजपमध्ये येणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. थोरात साहेब, तुम्हाला नामुष्की पत्कारुन विधानपरिषदेची दुसरी सीट मागे घ्यावी लागली, तुम्ही काय खडसेंना घेता. खडसे इतके लेचेपेचे नाहीत, असंही ते म्हणाले.

माणूस रागावतो, पण खडसेंनी जाहीरपणे रागवायला नको. ते आमचे बाप आहेत. त्यांच्या फंद्यात पडू नका, ती आग आहे. तुम्ही तुमची माणसं सांभाळा, असं देखील पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकिट द्यावं यासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात ते फार महत्वाचे नेते आहेत. मात्र त्यांना केंद्रातील वरिष्ठांनी तिकिट नाकारलं. खडसे यांना का नाकारलं असं त्यांना विचारण्याइतके आम्ही मोठे नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. त्यांनी आजवर अनेकांना डावलून घरात तिकिटं दिली, त्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा सवाल देखील पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या