Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजनअरे..हे काय चाललयं मुंबईत... चित्रा वाघ उर्फी जावेदवर नेमक्या का भडकल्या? वाचा...

अरे..हे काय चाललयं मुंबईत… चित्रा वाघ उर्फी जावेदवर नेमक्या का भडकल्या? वाचा…

मुंबई | Mumbai

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देतान दिसते. याच कारणामुळे अलीकडच्याच काळात उर्फीच्या कपड्यांवरुन पोलिस तक्रार देखील करण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान, आता नुकतेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करत उर्फी जावेदवर चांगल्याच संतापल्या आहेत. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील टॅग केले आहे. “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

उर्फी जावेद कायमच तिच्या वेशभूषेमुळे चर्चेत असते. ब्लेड्स गुंफून तयार केलेला ड्रेस, स्वतःचे फोटो, तर कधी नुसतीच पाईप गुंडाळून ती ड्रेस बनवते. त्यामुळे कायमच तिची चर्चा होत असते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्यावर जोरदार टीका झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या