Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्या“मला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधणार, माझी निष्ठा...”; पंकजा मुंडेंचं भगवान गडावरुन...

“मला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधणार, माझी निष्ठा…”; पंकजा मुंडेंचं भगवान गडावरुन जोरदार भाषण

बीड | Beed

सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. येथील दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपस्थितांना संबोधित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली तेव्हा दोन दिवसांत ११ कोटींचा निधी तुम्ही लोकांनी जमा केला. तुम्हाला मी काय दिलं? तुम्ही उन्हात बसला आहात म्हणून स्टेजही उन्हातच बांधलं आहे. एकवेळ मला काही मिळालं नाही तरीही चालेल पण तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

- Advertisement -

न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला.. इम्तेहान सख्त लेता है मगर हारने नहीं देता है.. असा शेरही आज पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. माझ्या आयुष्यात मी एखादी निवडणूक मी हरले असेन तरीही तुमच्या (जनतेच्या) नजरेतून मी पडलेले नाही. इथे आलेला एखाद्या जातीचा माणूस नाही. गोपीनाथ मुंडे म्हणायचे तसं माझ्या कातड्याचे जोडे करुन घातले तरीही तुमचं हे प्रेम, आपुलकी आणि ऋण मी फेडू शकत नाही. शेती करणारे लोक आज आनंदात आहेत का? त्यावर उपस्थितांनी नाही असं उत्तर दिलं. माझ्या भाषणात शेतमजूरही करणारे लोक आलेत त्यांनाही मजुरी मिळत नाही. ही आज परिस्थिती आहे. उस तोड कामगार आहेत, त्यांना पैसे वाढवून मिळणार नाहीत तोपर्यंत ते उस तोडायला जाणार नाही. सगळ्यांच्या कष्टाचं चीज होईपर्यंत मी शांत बसणार नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्रात एवढे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे. ओबीसी समाज सरकारकडे आशेने पाहतो आहे. आता अपेक्षाभंगाचं दुःख कुठलाही समाज सहन करु शकत नाही. शिवशक्ती परिक्रमेसाठी जेव्हा मी गेले तेव्हा जेसीबीने फुलं उधळून माझं स्वागत करण्यात आलं. मी तुम्हाला स्वाभिमान देऊ शकते म्हणून तुम्ही माझं स्वागत अशा पद्धतीने केलं होतं. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होतील असं त्यांनाही वाटलं नव्हतं. मात्र त्यांनी कष्ट केले, मला राजकारणात आणलं तेव्हा एकच सांगितलं पंकजा तुझ्या पदरात मी जनता टाकतो आहे त्यांची काळजी घे. ज्यादिवशी तुम्ही माझ्या कारखान्यासाठी तुम्ही पैसे जमवत होतात तेव्हा माझ्या मुलाने मला फोन केला आणि मला सांगितलं की इतके पैसे जमा केले आहेत ते तू घेणार आहेस का? मी म्हटलं मी पैसे घेणार नाही पण लोकांचे आशीर्वाद घेणार. भगवानबाबांच्या साक्षीने तुम्हाला सांगते की माझ्या मुलाआधी, कुटुंबाआधी ही जनता माझी जबाबदारी आहे. माझ्यावर आई म्हणून माझा मुलगा जितकं प्रेम करतो त्यापेक्षा जास्त प्रेम ही जनता माझ्यावर करते हे मी मुलाला सांगितलं असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

चारित्र्यहीन आणि पैशांच्या जोरावर निवडून येणा-यांना आता पाडणार असा एल्गार भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केल आहे. पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. जिंकून येण्याासठी तुम्ही निष्ठा गहाण टाकू शकत नाही असा घरचा आहेर त्यांनी नाव न घेता पक्षाला दिलाय. २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदनात उतरणार असे म्हणत पंकजा मुंडेंनी निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहे. राज्यात सध्या फोडाफाडीचे राजकारण आणि अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण ढवळून निघाले आहेत.पाच वर्षे मी पक्षासाठी मरमर निष्ठेने काम केले. मध्यप्रदेश, परळीत काम केले. भगवान बाबांना सुद्धा दुसरा गड बनवावा लागला, भगवान श्री कृष्णाला मथुरा सोडावी लागली, असे म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, निवडणुकीत माझा पराभव झाला. माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊ चालावे लागेल. माझ्यामुळे या स्टेजवर बसलेल्यांना त्रास कमी होतो पण माझ्या जनतेल जास्त त्रास होतो. दर वेळी तुमचा नेहमी अपेक्षा भंग होतो.त्यासाठी मी तुमची माफी मागते. कुणी म्हणते ताई या पक्षात चालल्या आहेत. दुसऱ्या पक्षात जाण्या इतकी पंकजा मुंडेची निष्ठा लेचीपेची नाही. आता आपल्याला त्रास देणाऱ्यांचे घर आपण उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना मी त्रास होणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या