मुंबई | Mumbai
टिकटॉक स्टार आणि भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे गोव्यात (GOA) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले होते. सोनाली यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने सोनाली यांचा मृत्यू संशयास्पद असून यामागे मोठे कटकारस्थान असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे…
याबाबत सोनाली यांच्या भावाने म्हटले होते की, पीए सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवले. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ (Narcotics) मिसळून तिच्यावर बलात्कार करून तिचा व्हिडिओही बनवला होता.
त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्याने तिला ब्लॅकमेल करत होते. हे दोघे अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट रचत गोव्यात नेऊन तिची हत्या केली, असा आरोप सोनालीच्या भावाने केला आहे.
तसेच सोनाली यांचा शवविच्छेदन अहवाल सामोर आला असून त्यांच्या शरीरावर चार ते पाच जखमांचे घाव दिसून आले आहेत. विष (poison) देऊन हत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच सोनाली फोगट यांचे व्हिसारा चाचणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्यांची तपासणी केल्यानंतर सोनाली यांना विष किंवा केमिकल देण्यात आले होते की नाही, याची माहिती अहवालातून मिळणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी सोनालीच्या कुटुंबियांनी गोवा पोलिसात (Goa Police) धाव घेत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी सोनाली फोगट यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्याविरोधात आयपीसी कलम ३०२ अंतर्गत खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे.