Thursday, July 4, 2024
Homeदेश विदेशअध्यक्षपदाबाबत भाजपची तडजोड नाहीच…; उपसभापतीपदाबाबत होऊ शकतो 'हा' निर्णय

अध्यक्षपदाबाबत भाजपची तडजोड नाहीच…; उपसभापतीपदाबाबत होऊ शकतो ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून लोकसभा अध्यक्षांबाबत चर्चा सुरू आहे. आता भाजप लोकसभा अध्यक्षपद राखणार असल्याची माहिती समोर येत आहे, तर एनडीएच्या मित्रपक्षाला उपसभापतीपदाची जबाबदारी मिळू शकते. या संदर्भात भाजपने एनडीए मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत निर्माण करण्याची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे.

- Advertisement -

मोदी ३.० सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. युती धर्म पाळू, पण डोके झुकवून मान खाली घालून सरकार चालवणार नाही, असा संदेश भाजपने एकप्रकारे मित्रपक्षांना दिला आहे. मंत्रिमंडळ वाटपात भाजपचे वर्चस्व निश्चितपणे दिसून आले. आता भाजपने लोकसभा अध्यक्षपदावरही ‘व्हिटो’ केला आहे. यावरून भाजपला सभापतीपदासाठी तडजोड करायची नाही, हे स्पष्ट होते. यात मात्र, उपसभापतीपद एनडीएच्या मित्रपक्षाला मिळू शकते.

हे ही वाचा : अजितदादांचं कुटुंब आता वेगळं…; रोहित पवारांचं मोठं विधान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे ठेवणार असून उपसभापतीपद त्यांचा मित्रपक्ष एनडीएला देणार आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर एनडीए मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांशी बोलून एकमत घडवण्याची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठांनी (हायकमांडने) दिली आहे.

रविवारी राजनाथ यांच्या घरी झाली बैठक
लोकसभा अध्यक्षपद भाजप सोडणार नाही, एनडीएच्या मित्रपक्षाला मात्र उपसभापतीपद मिळू शकते. यादरम्यान संसदेच्या अधिवेशनासंदर्भात रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी मोठी बैठक झाली. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू, जेडीयू नेते लालन सिंह, चिराग पासवान सहभागी झाले होते, या बैठकीत 18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनासाठी आणि सभापती आणि उपसभापतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सभापतींनी चर्चा केली.

सभापती व उपसभापती पदाचे आव्हान कायम आहे.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून एनडीएने सरकार स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही खात्यांचे वाटप केले असून, आता लोकसभा अध्यक्षपदाच्या चर्चेला उधाण आले असून, भाजपसमोर एनडीएचे आव्हान आहे. मागील सरकारमध्ये कोटा येथील भाजपचे खासदार ओम बिर्ला यांनी सभापतीपदाची सूत्रे हाती घेतली होती, मात्र सध्याच्या सरकारमध्ये या पदाबाबत चर्चा सुरू आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या