Wednesday, May 29, 2024
Homeजळगावभाजपचे विधानपरिषदचे आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व अंतरिम जामीन

भाजपचे विधानपरिषदचे आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व अंतरिम जामीन

जळगाव Jalgaon। प्रतिनिधी

बीएचआर घोटाळा BHR scam प्रकरणात भाजपचे विधानपरिषदचे आमदार चंदूलाल पटेल BJP MLA Chandulal Patel यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर Pre-arrest bail पुणे न्यायालयाने Pune Court सोमवार, 16 ऑगस्ट रोजी निकाल दिला. न्यायालयाने पैसे भरण्याच्या अटीशर्तीवर आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर Interim bail granted केला आहे.

- Advertisement -

10 दिवसाच्या आत घेतलेल्या एकूण कर्जाच्या 20 टक्के भरणे तर उर्वरीत 20 टक्के रक्कम 3 महिन्यांच्या आत भरण्याच्या अटीशर्तीवर हा अंतरिम जामीन मंजूर झाला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी बोलतांना दिली.बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात 25 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मुख्य संशयित जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांच्यासह एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात जळगाव शहराचे आमदार चंदूलाल पटेल यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. आमदार पटेल यांनी 2014 मध्ये बीएचआर पतसंस्थेकडून 2 कोटींचे कर्ज घेतले होते.

मात्र प्रत्यक्षात एक रुपयाचीही कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत दोन कोटींचे व्याजासह रक्कम पतसंस्थेला भरावी लागणार आहे. दरम्यान कर्ज घेवून बेकायदेशीरित्या परतफेड करणार्‍या बड्या व्यापार्‍यासह उद्योजकांना अटक झाल्यानंतर आ.पटेल यांनी पुणे येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

न्या. एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात सोमवार, 16 ऑगस्ट रोजी कामकाज झाले. आ. पटेल यांनी पैसे भरण्याची तयारी दर्शविल्यावर . एकूण कर्जाच्या 20 टक्के रक्कम 10 दिवसाच्या आत भरणे तर उर्वरीत 20 टक्के रक्कम तीन महिन्याच्या भरण्याच्या अटीशर्तीवर न्या. गोसावी यांनी आमदार चंदू पटेल यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

तर 40 टक्के रक्कम भरल्यानंतर न्यायालयाचे पुढील आदेशानुसार पुढील रक्कम भरण्यासह इतर कार्यवाही करण्यात येणार आहे. असे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी बोलतांना सांगितले. आ. चंदू पटेल यांच्यातर्फे अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या