Saturday, April 26, 2025
HomeराजकीयGopichand Padalkar : …तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल, गोपीचंद पडळकरांची जीभ...

Gopichand Padalkar : …तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल, गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

कोल्हापूर | Kolhapur

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आज राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -

या आंदोलनादरम्यान बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. धनगरांनी मेंढरं, बकरी राखायचे बंद केले तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचे मटण खायला लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत. पडळकर यांच्या या विधानावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुणे बेंगलोर महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या आंदोलनादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनगर आरक्षणाची बाजू मांडताना पडळकरांची हे धक्कादायक विधान केले आहे.

हे ही वाचा : …तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीतील नेत्याचा निर्वाणीचा…

एकीकडे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमधील वाचाळविरांनी पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांबाबत विधानं करण्याचे प्रकारही समोर येता आहेत. अशातच आता पडळकरांनी केलेल्या या विधानाने नवा वादंग उभा राहण्याची शक्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...