Wednesday, June 26, 2024
Homeमुख्य बातम्यानितीन देसाईंच्या ND स्टुडिओसाठी रश्मी, उद्धव ठाकरेंकडून दबाव; राणेंचा गंभीर आरोप

नितीन देसाईंच्या ND स्टुडिओसाठी रश्मी, उद्धव ठाकरेंकडून दबाव; राणेंचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

- Advertisement -

कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) आत्महत्या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडिओ उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा माणूस देसाईंना धमक्या देत होता, असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले, नितीन देसाई हा एक चांगला माणून होता. ते फार मेहनती होते. माझे वैयक्तिक फार चांगले संबंध होते. पण देशाला आणि महाराष्ट्राला कळले पाहिजे की, त्यांनी स्टुडिओ विकत द्यावा असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा होता. इतकेच नाही तर राणे यांनी एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या मातोश्रीच्या निगडीत माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या, असा आरोप देखाल यावेळी केला.

ठाकरे सिनेमाचे शूटिंगही एनडी स्टुडिओत झाले होते. त्याचे त्यांनी पैसे दिले का? असे नितेश राणे म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, यंत्रणेला जो दिवसरात्र धमक्या देतोय, २०२४ ला नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार आणि हा आतमध्ये जाणार. कारण याने जे लोकांचे पैसे खाल्लेत, तुझं काही वाचणं नाही. तु आणि तुझ्या मालकाचा मुलगा दोघं आर्थर रोज जेलमध्ये जाणार असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या