Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuresh Dhas: सुरेश धसांची धनंजय मुंडेविरोधात नवी चाल; कृषि विभागाकडे मागितली 'त्या'...

Suresh Dhas: सुरेश धसांची धनंजय मुंडेविरोधात नवी चाल; कृषि विभागाकडे मागितली ‘त्या’ निर्णयांची माहिती

मुंबई । Mumbai

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपाचे आमदार सुरेश धस हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. सातत्याने धसांकडून धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप केली जात आहेत. मात्र, एकीकडे आरोप आणि दुसरीकडे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.

- Advertisement -

धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी सुरेश धस गेल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. बावनकुळे यांनी अगोदरच म्हटले होते की, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाही. काही दिवसांपूर्वीच सुरेश धस हे अजित पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र, अजित पवारांशी सुरेश धस यांची भेट होऊ शकली नाही आणि त्यांना भेट न घेताच बीडला परतावे लागले.

त्यामुळे सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती. ‘संतोष देशमुखांचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील, असं कधीही वाटलं नव्हतं.’ असं म्हणत मनोज जरांगेंनी सुरेश धसांवर बरीच आगपाखड केली होती. अशावेळी आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात एक नवी आघाडी उघडली आहे.

सुरेश धस यांनी कृषि विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या अशी मागणी केली आहे. तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती सुद्धा सुरेश धस यांनी आता या पत्रामधून मागवली आहे. तर २०२० ते २०२५ पर्यंतच्या पत्रव्यवहाराची माहिती द्या, अशी मागणी करत सुरेश धस यांनी प्रधान सचिवांना हे पत्र लिहिले आहे.

तसेच कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढविण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती द्या, अशी मागणी धसांनी केली आहे. तर खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं सुरेश धस यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. याचबरोबर कृषी मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी यांचे एकमेकांशी लागेबांधे होते, कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केला आहे.

सुरेश धसांचं पत्र जसाच्या तसं…

महोदय,

उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आलेल्या कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास साठी विशेष कृती योजनेमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाद्वारे करण्यात आलेल्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याबाबत तक्रारी वेगवेगळ्या स्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत. तसेच मां. हायकोर्टात देखील याचिका दाखल झालेल्या आहेत.

या संदर्भात विशेष कृती योजनेतील कार्यक्रमात भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने, तत्कालीन कृषी मंत्री कार्यालय तसेच आपल्या कार्यालयातील काही अधिकारी तसेच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील काही अधिकारी व कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी व तत्कालीन कृषी मंत्री या सर्वांच्या संगनमताने शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.

त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा व भ्रष्टाचाराचा उघड करण्यासाठी व न्यायालयीन प्रक्रियेसाठी मला विधानसभेत याबाबत विचारणा करण्याची आवश्यकता असल्याने मला वर विषयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मां. कृषी मंत्री, कृषी मंत्री कार्यालय, प्रधान सचिव कृषी कार्यालय, आयुक्त कृषी कार्यालय, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यालय यामध्ये सभेसंदर्भात निधी वितरणा संदर्भात, अंमलबजावणी संदर्भात, निरनिराळ्या समित्यांच्या घेण्यात आलेल्या सभांच्या संदर्भात झालेला पत्रव्यवहार, घेतलेले निर्णय, टिपणी सहाय्यक पासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रत्येक स्तरावर झालेल्या टिपण्यासह, प्रत्येकाने टिपणीमध्ये मांडलेल्या मतासह संपूर्ण नस्ती मला हवी आहे तरी कृपया मला ती त्वरित उलट टपाली देण्याबाबतची विनंती आहे.

दरम्यान सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या बातम्या मध्यमांमध्ये झळकल्या. त्यानंतर स्वतः धस यांनी माध्यमांसोबत संवाद साधून भेट घेतल्याचे स्पष्ट केले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे आणि धस यांच्यात तब्बल चार तास चर्चा झाली असा गौप्यस्पोट केला. त्यानंतर धस यांच्यावर चांगलेच टीकेचे झोड उठले. धस यांच्याकडून ही भेट फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...