Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : "त्यांच्या जिभेला चटके..."; आमदार संजय गायकवाडांनंतर भाजप खासदाराचे राहुल...

Rahul Gandhi : “त्यांच्या जिभेला चटके…”; आमदार संजय गायकवाडांनंतर भाजप खासदाराचे राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देईल, असे म्हणत वादग्रस्त विधान केले होते. यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा : नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वालदेवी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

अशातच आता गायकवाड यांचे हे वक्तव्य ताजे असतानाच भाजप खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी राहुल गांधींविरुद्ध वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की,”संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके दिले पाहिजे’ अशा लोकांच्या जिभेला चटके देणे आवश्यक आहे” असे वक्तव्य बोंडे यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : दशकभरानंतर जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांमध्ये उत्साह

तसेच राहुल गांधी, ज्ञानेश महाराव किंवा श्याम मानव असो. भारतातील बहुसंख्याकांच्या जे भावना दुखावतात. त्या लोकांना कमीत-कमी जाणीव करून दिली पाहिजे,असेही अनिल बोंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गायकवाड आणि बोंडे यांच्या विधानावरून महायुतीत (Mahayuti) वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हे देखील वाचा : नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला अन्…

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी, “देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण रद्द करण्याचा विचार करू,” असे विधान केले होते. यावरून भाजप, बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि भाजपच्या इतर काही मित्रपक्षांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या