Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशराहुल गांधी यांच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा संसदेत पलटवार; म्हणाल्या...

राहुल गांधी यांच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा संसदेत पलटवार; म्हणाल्या…

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी आज संसदेत मणिपूर (Manipur Violance) मुद्यावर आक्रमक भाषण केले. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या भाषणाचा केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी (BJP MP Smriti Irani) यांनी समाचार घेतल्याचे पहायला मिळाले.

- Advertisement -

इंडिया आघाडीमधल्याच एका नेत्याने म्हंटले होते, भारताचा अर्थ केवळ उत्तर भारत आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या साथीदाराच्या वक्तव्याचे खंडन करावे. काँग्रेसच्या नेत्याने काश्मिरमध्ये जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केले होते. जम्मू-काश्मिरला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य करणारा नेता काँग्रेसमध्ये का आहे. गांधी कुटुंबात हिंमत असेल त्यांनी याचे खंडन करुन दाखवावे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

देशभरात बॉंम्बस्फोट घडवण्याचा इशारा,पुण्यात एका व्यक्तीला ई-मेलवर धमकी आल्याने खळबळ

दरम्यान, पुढे त्या असे ही म्हणाल्या, अध्यक्ष महोदय आज तुमच्या आसनासमोर ज्या प्रकारच आक्रमक वर्तन पहायला मिळाले, ते मान्य नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असे बोलले गेले. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होता. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येते, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे” असे स्मृती इराणी म्हणाल्या.

…म्हणून शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

यावेळी स्मृती ईराणी यांनी काश्मीर पंडीतांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी काही अत्याचार पिडित महिलांचा व त्यांच्याबाबतच्या घटनांचाही यावेळी उल्लेख केला. “तुम्ही आम्ही काश्मिरी पंडितांबद्दल बोलू इच्छित नाही. त्यांनी अश्रू ढाळले, दौरे केले. पण १९८४ च्या दंगलीत पत्रकार प्रणय गुप्ता यांनी लिहिले होते की, मुलांना मारून त्यांचे मृतदेह आईच्या पुढ्यात टाकण्यात आले होते.

मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

नुकतेच राजस्थानच्या भिलवाडा येथे १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर ते कापण्यात आले. मग भट्टीत ठेवण्यात आले. दोन महिला खासदार तिथे गेल्या होत्या. तेथे मुलीचा एक हात भट्टीच्या बाहेर पडला होता. बंगालमध्ये एका ६० वर्षीय महिलेवर तिच्या नातवासमोर बलात्कार झाला, तेव्हा या काँग्रेसच्या लोकांनी न्यायासाठी याचना केली नाही. यावर एक शब्दही बोलण्यात आला नाही,” अशा शब्दांत भाजपविरोधी राज्यांतील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी भाष्य केले.

“एकवेळ अशी होती की, काश्मीरमध्ये रक्तपात झालेला. पण राहुल गांधी जेव्हा काश्मीरमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत पोहोचले, तिथे फिरत होते. हे मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे शक्य झाले. काँग्रेस नेते पुन्हा तिथे गेले, त्यावेळी त्यांनी कलम ३७० लागू करण्याबद्दल भाष्य केले” असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या