मुंबई | Mumbai
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी (sushant singh rajput cases) रोज नव-नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणी अनेक दावे केले जात आहे. त्यातच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (bjp mp subramanian swamy) यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
- Advertisement -
सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग झाल्याने त्याचे शवविच्छेदन जाणीवपूर्वक उशिरा करण्यात आले, असा गंभीर आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्विट करत केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मारेकऱ्यांची राक्षसी मानसिकता आणि त्यांची मजल कुठवर गेली, हे हळूहळू उघडकीस येत आहे. सुशांतचे शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केले गेले. ज्यामुळे सुशांतच्या शरीरातील विष पोटातील पाचक द्रवपदार्थात मिसळतील आणि ते ओळखणं कठीण होईल. या प्रकरणात जे जबाबदार आहेत त्यांना पकडण्याची वेळ आली आहे.”