Sunday, October 4, 2026
Homeराजकीयभाजपात मोठा फेरबदल! नव्या कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना मोठी संधी

भाजपात मोठा फेरबदल! नव्या कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोठी संधी

दिल्ली । Delhi

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली असून, महाराष्ट्राला यामध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. माजी खासदार डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

याशिवाय, मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्री म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली असून, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर पुन्हा एकदा राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, पक्षाच्या डिजिटल आणि सोशल मीडिया संघटनेतही बदल करण्यात आले असून, प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनुभवी तसेच विविध राज्यांतील नेतृत्वाला संधी देण्यात आल्याचे मानले जात आहे. नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दोषनिश्चितीचा टप्पा सुरु,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्यातील भीती आणि मंत्रोपचारांचा बनाव रचून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याच्याविरुद्धच्या कायदेशीर...