मुंबई –
राज्यातील आघाडीचे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, सरकार बनवण्याची घाई भाजपला नाही. कालच्या भेटीचा
- Advertisement -
राजकीय अर्थ काढला गेला, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी कालची भेट झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि करणारही नाही, राज्यात सरकार स्थापन्यासाठी शिवसेनेसोबत कसलीही चर्चा सुरू नाही. सध्या सरकारचे जे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पडेल त्यावेळी पुढे काय करायचे बघू मात्र भाजपला सरकार बनवण्याची कोणतीही घाई नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.