श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
येथील भाजपाचे नेते व जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी नुकतीच यासंदर्भातील घोषणा केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर या ज्येष्ठांशी विचारविनीमय करून श्री. टिळेकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
श्रीरामपूर तालुका भाजपा सरचिटणीस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजपा तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटन सरचिटणीस अशा चढत्या क्रमाने श्री. चित्ते यांना जबाबदार्या मिळत गेल्या व त्या त्यांनी अत्यंत समर्थपणे व कुशलतेने पार पाडल्या.
श्रीराम शिळा पूजन, श्रीराम ज्योत यात्रा, हुतात्मा कारसेवक, अस्थी कलश यात्रा याचे तालुका संयोजक म्हणून त्यांनी काम केले आहे.
प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान ही तालुक्याची सायकलवर केलेली परिक्रमा, भाजपाचे घरचलो अभियान, बुथ विस्तार अभियान, संघटन पर्वातील एक बुथ 25 युथ अशी बुथ कमिट्यांची बांधणी ही सर्व कामे प्रकाश चित्ते यांनी त्यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाने तालुक्यात पार पाडली. याचीच परिणीती म्हणून बुथ विस्तार अभियानात महाराष्ट्रातील पहिल्या 3 विधानसभा मतदार संघात श्रीरामपूरचा क्रमांक लागला.
प्रकाश चित्ते यांच्या निवडीबद्दल भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री व आ. राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश चिटणीस सौ. स्नेहलताताई कोल्हे, आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, शिवाजीराव कर्डिले, खा. डॉ. सुजय विखे, मा. खा. दिलीप गांधी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपा दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपा नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, प्रदेश कामगार आघाडी उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी शहराध्यक्ष संजय पांडे, श्रीरामपूर न. प. तील भाजपा नगरसेवक व शहराध्य किरण लुणिया, रवि पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.