Saturday, May 25, 2024
Homeजळगावमुक्ताईनगर येथे भाजपा कार्यालयावरील फलक गायब

मुक्ताईनगर येथे भाजपा कार्यालयावरील फलक गायब

मुक्ताईनगर – 

मुक्ताईनगरचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेवर अशा चर्चा सुरू असतानाच बुधवारी मुक्ताईनगर येथील भाजपा कार्यालयावर लावण्यात आलेले ‘भाजपा कार्यालय’ हा फलक गायब झाला. यामुळे खडसे यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चा खर्‍या ठरणार का? अशी नवीन चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगर जेडीसीसी बँकेच्या जवळ असलेले भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यालय नेहमी उघडे असते. नेहमीप्रमाणे भाजपाचे पदाधिकारी  व कार्यकर्ते बुधवारी कार्यालयात आले. यावेळी भाजपा कार्यालय मुक्ताईनगर असे भलेमोठे फलकच आढळून आले नाही.

फलक कुठे गेला किंवा कोणी काढला का? यासंदर्भात भाजपाच्या सामन्य कार्यकर्त्यांना कल्पना नव्हती. या कार्यालयात  पंचायत समितीचे माजी सभापती राजू माळी, विठ्ठल जोगी, राजू कपले, खडकाचे मुंढोळदा उपसरपंच रावजी धनगर तसेच जानकीराम पांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मी बाहेरगावी- कांडेलकर

भाजप कार्यालयावरील फलक नसल्याबद्दल तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर यांच्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी गेल्या चार दिवसांपासून बाहेरगावी आहे. भाजप कार्यालयावर फलक होता. आता यासंदर्भात मला काहीच कल्पना नाही.’

- Advertisment -

ताज्या बातम्या