Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यादूर झाली कटूता! धनंजय मुंडेंचं औक्षण करताना पंकजा मुंडे भावुक, Video आला...

दूर झाली कटूता! धनंजय मुंडेंचं औक्षण करताना पंकजा मुंडे भावुक, Video आला समोर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकतीक अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बीडमधील परळीतून राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांचीही वर्णी कॅबिनेटमध्ये लागली. त्यामुळे गेली अनेक वर्ष विळा-भोपळ्याचं नातं असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाप्रकारे सत्तेतील वाटेकरु झाले. त्यानंतर दोघांमधील दुरावाही कमी होताना दिसत आहे. कारण पंकजांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओ खुद्द धनंजय मुंडेंनीच ट्विटरवर शेअर केला आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडे म्हणाले की, राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ताईने माझं औक्षण केलं आणि शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाचा व्हिडीओ पाऊन अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादीच्या दोन गटात वाद सुरू असताना हा व्हिडीओ आता चांगलाच चर्चेत आला आहे.

NCP Crisis : शरद पवारांनी बंडखोरांना ठणकावले; म्हणाले, “जीवंतपणी माझ्या…”
NCP Crisis : घरी बसून आशीर्वाद द्या म्हणता, तुमच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या; सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास तयार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु चर्चेचे खंडनही केलेले नाही. त्यातच पंकजा आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेत असल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.

भाजपमध्ये मोठे फेरबदल! अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले

- Advertisment -

ताज्या बातम्या