Saturday, May 4, 2024
Homeनगरसंगमनेरात भाजपकडून महाविकास आघाडीचा निषेध

संगमनेरात भाजपकडून महाविकास आघाडीचा निषेध

संगमनेर | प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Govt) दबाबाखाली पोलिसांनी (Police) अपमानास्पद वागणूक दिली आहे. सरकार व पोलीस प्रशासनाच्या या वागणूकीचा भारतीय जनता पार्टी (BJP) संगमनेर (Sangamner) शहर व तालुका तर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली.

- Advertisement -

तहसीलदार देवरेंविरोधात कर्मचार्‍यांनी थोपटले दंड

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्वतःवर झालेली टीका देखील खुल्या दिलाने स्विकारु शकत नाही. सत्ताधारी पक्षातील नेते व कार्येकर्ते इतरांवर शिवराळ भाषेत बोलतात व टिकाटिपणी करतात. मात्र स्वतःबाबत झालेली टीका त्यांना सहन होत नाही. तसेच राजकीय टिका देखील सहन होत नाही. सत्ताधार्‍यांचा पोलीस यंत्रणेचा गैरवापर दुर्दैवी आहे. सत्ताधार्‍यांची दडपशाही सहन केली जाणार नाही, नारायण राणे यांना केलेल्या बेकायदेशिर अटकेचाही भाजप निषेध करत आहे.

याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार उमाकांत कडनोर यांनी स्विकारले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, विद्यमान नगरसेविका जिल्हा सचिव मेघाताई भगत, विठ्ठल शिंदे, वैभव लांडगे, सीताराम मोहरिकर, योगेश मांगलकर, किशोर गुप्ता, दिपेश ताटकर, शशांक नामन, मच्छिंद्र सोनवणे, आनंदा मोकळ, माधव थोरात, श्रीकांत कासट, सुनील वाकचौरे, विनायक थोरात, अमित गुप्ता, शाम कोळपकर, मनोज जुंद्रे, डॉ. सोमनाथ कानवडे, शिवाजी आहेर, वरद बागुल, किरपाल डंग, विनायक कानकाटे, नीलकंठ भडांगे, विलास रासकर, स्वप्नील उपासनी, शुभम बेल्हेकर, नानासाहेब खुळे, प्राजक्ता बागुल, शैलेश फटांगरे, स्वप्नील लोंढे, संतोष पठाडे, विकास गुळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisment -

ताज्या बातम्या