Sunday, September 8, 2024
Homeजळगावभाजपाच्या खा. रक्षा खडसेंनी घेतला राष्ट्रवादीचे आ. खडसेंचा आशीर्वाद

भाजपाच्या खा. रक्षा खडसेंनी घेतला राष्ट्रवादीचे आ. खडसेंचा आशीर्वाद

जळगाव – लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी भाजपाच्या खा. रक्षा खडसे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा त्यांच्या निवासस्थानी पाया पडून आशीर्वाद घेतले. दरम्यान आ. खडसेंनी मुलीप्रमाणेच सुनेच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला.

लोकसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघातून विद्यमान खा. रक्षा खडसे ह्या भाजपाच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे श्रीराम पाटील हे निवडणूक लढवित आहे. सध्या शरीराने राष्ट्रवादीत असलेले पण मनाने भाजपात गेलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांनी खा. रक्षा खडसे यांना राजकारणाचे बाळकडू पाजले आहे. सून म्हणून घरात आल्यानंतर आ. खडसे यांनी रक्षा खडसे यांना कायम मुलीप्रमाणेच वागणूक दिली. दरम्यान निखील खडसे यांच्या मृत्यूनंतर आ. खडसे हे रक्षा खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मध्यंतरीच्या काळात आ. खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु आता पुन्हा केवळ सुनेसाठी त्यांनी भाजपात जाण्याची घोषणा केली आहे. अद्याप त्यांचा प्रवेश झाला नसला तरी मनाने ते भाजपात गेले आहे. त्यामुळेच आज अर्ज भरण्यापूर्वी खा. रक्षा खडसे यांनी आ. एकनाथराव खडसे यांचा पाया पडून आशीर्वाद घेतांनाचा भावूक क्षण उपस्थितांनी अनुभवला

- Advertisment -

ताज्या बातम्या