Saturday, August 22, 2026
HomeराजकीयPune News : पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजपचे खासदार आणि आमदार यांच्यामध्ये नाराजीनाट्य;...

Pune News : पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजपचे खासदार आणि आमदार यांच्यामध्ये नाराजीनाट्य; नेमकं काय घडलं?

पुणे (प्रतिनिधी)

पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरून शुक्रवारी भाजपचे खासदार आणि आमदार यांच्यामध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. आमदार अभिमन्यू पवार यांनी मारलेल्या टोमण्याने नाराज झालेल्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले. तसेच, त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर, मी जातीचा विषय किंवा वाद काढलाच नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने पुणे येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावरील पहिल्या रांगेत विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे उपस्थित नसल्याने त्यांची खुर्ची रिकामी होती.

या खुर्चीवर खासदार मेधा कुलकर्णी बसणार होत्या. मात्र, त्यांना पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवार यांनी टोमणा मारला. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बर दिसणार नाही. नरेंद्र पाटील यांना बसू द्या. तुम्ही बसलात तर वाद निर्माण होईल, असे त्यांनी म्हटल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत कुलकर्णी यांनी तेथून निघून जाणे पसंत केले.

याबाबत अभिमन्यू पवार म्हणाले, व्यासपीठावर पहिल्या रांगेत अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना बसू द्या. आपण दोघे मागे बसू, मी मेधाताईंना एवढेच बोललो. त्यामध्ये कोणताही जातीचा विषय किंवा वाद नाही. यानंतरही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...